1 Chronicles 3

1आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते.

अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ;
अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
2गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र,
हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चवथा.
3अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा.
दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.

4दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले. 5यरुशलेमात जन्मलेली दावीदाची पुत्र बथशूवाला चार पुत्र झाले. बथशूवा अम्मीएलची कन्या. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.

6इतर नऊ पुत्र

इभार, अलीशामा, एलीफलेट,
7नोगा, नेफेग, याफीय, 8अलीशामा, एल्यादा, एलीफलेट. 9ही दावीदाची पुत्र होती, त्यात त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.

10शलमोनाचा पुत्र रहाबाम होता.

रहबामाचा पुत्र अबीया होता.
अबीयाचा पुत्र आसा.
आसाचा पुत्र यहोशाफाट.
11यहोशाफाटाचा पुत्र योराम.
योरामाचा पुत्र अहज्या होता.
अहज्याचा पुत्र योवाश होता.
12योवाशाचा पुत्र अमस्या होता.
अमस्याचा पुत्र अजऱ्या होता.
अजऱ्याचा पुत्र योथाम होता.

13योथामाचा पुत्र आहाज होता.

आहाजाचा पुत्र हिज्कीया,
हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
14मनश्शेचा पुत्र आमोन होता,
आमोनचा पुत्र योशीया होता.

15योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम. 16यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.

17यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे शल्तीएल, 18मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.

19पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती. 20जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत. 21पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.

22शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट. 23नाऱ्याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम. एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.

24

Copyright information for MarULB